

avdhoot gupte
esakal
'आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदेपोहे' हे गाणं ऐकलं नाही असा व्यक्ती सापडणं अवघड आहे. असा एक काळ होता जेव्हा हे गाणं प्रत्येकाच्या ओठावर असायचं आणि प्रत्येकाच्या प्लेलीस्टमध्ये वाजायचं. तरुणाईला या गाण्याने वेड लावलेलं. हे गाणं लिहिलेलं लोकप्रिय मराठी गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते याने. तर या गाण्याचा मंत्रमुग्ध करणारा आवाज होता लोकप्रिय बॉलीवूड गायिका सुनिधी चौहान हिचा. मात्र या गाण्यासाठी सुनिधी पहिली पसंती नव्हती. त्यापूर्वी अवधूतने हे गाणं एका मराठी अभिनेत्रीकडून गाऊन घेतलं होतं. त्याला वाटत नव्हतं की सुनिधीने हे गाणं गावं. एका मुलाखतीत त्याने याचं कारण सांगितलंय.