

avdhoot gupte
ESAKAL
मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि परीक्षक अवधूत गुप्ते पुन्हा एकदा ‘सारेगमप’ च्या मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत परतले आहेत. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या ‘सारेगमप’च्या या नव्या पर्वात नव्या पिढीचे नवे आवाज, त्यांची संगीताकडे पाहण्याची बदललेली दृष्टी आणि सोशल मीडियामुळे बदललेलं संगीतविश्व पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने त्यांनी नव्या पिढीचं संगीत, सोशल मीडियाचा प्रभाव, स्पर्धकांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या संगीतप्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.