Avinash & Aishwarya Dance
Avinash & Aishwarya DanceEsakal

Avinash & Aishwarya Narkar : "अरे हे कंचन"वर ऐश्वर्या-अविनाश यांचा भन्नाट डान्स; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Avinash Narkar & Aishwarya Narkar : अविनाश आणि ऐश्वर्या यांनी "अरे हे कंचन" गाण्यावर केलेला डान्स व्हायरल झालाय.
Published on

सोशल मीडिया गाजवणारं एक कलाकार जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. त्यांचे डान्स रील्स आणि कॉमेडी रील्स सोशल मीडियावर चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर 80 च्या दशकातील “होगा तुमसे प्यारा कौन…” हे गाणं पुन्हा एकदा सध्या सोशल मीडियावर गाजतंय.

सध्या अनेकजण या गाण्यावर रील्स शेअर करत असून अविनाश आणि ऐश्वर्या यांनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही.

नुकतंच या दोघांनी सोशल मीडियावर “होगा तुमसे प्यारा कौन…अरे हे कंचन”  या ट्रेंडिंग गाण्यावर रील शेअर केलं. त्यांच्या जबरदस्त डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या या डान्स रीलला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट करत त्यांच्या डान्स स्किल्सचं कौतुक केलं.

सोशल मीडियावर होतंय कौतुक

"फिट आणि सुपर हिट जोडी इन सिने सोसायटी" अशी कमेंट एकाने केलीये तर एकाने "तो सही आपसे प्यारा कोई नहीं" अशी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं. काही जणांनी त्यांना सुपर जोडी म्हणत त्यांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत.

Avinash & Aishwarya Dance
Aishwarya Narkar: बाळा तुला सद्बुद्धी नाही दिली?? ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी दिले रोखठोक उत्तर

या आधीही झालेत डान्स रील्स व्हायरल

या आधीही या जोडीने अनेक डान्स रील्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यांची कच्चा बदाम, लय भारी या गाण्यावरची रील व्हायरल झाली होती. अविनाश यांचा अतरंगी डान्स या आधीही व्हायरल झालाय. अनेकांनी त्यांच्या या भन्नाट स्टाईलचं कौतुक केलंय.

दरम्यान, या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत रुपाली ही निगेटिव्ह भूमिका साकारत आहेत. तर, अविनाश नारकरांच्या ‘कन्यादान’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये त्यांच्याशिवाय अनिषा सबनीस, संग्राम साळवी, अमृता बने, स्मितल हळदणकर, चेतन गुरव, शुभंकर एकबोटे असे अनेक कलाकार होते.

याशिवाय अविनाश यांनी फकाट, उदय आणि कॉफी आणि बरंच काही या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर ऐश्वर्या यांच्या या सुखांनो या, दुहेरी आणि महाश्वेता या मालिका गाजल्या होत्या.

Avinash & Aishwarya Dance
Aishwarya Narkar Dance: 'असं नाचता यायला पाहिजे!' ऐश्वर्या- अविनाश नारकर यांचा डान्स पाहून व्हाल फिदा!
Marathi News Esakal
www.esakal.com