

avinash narkar
esakal
मराठी सिनेसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते अविनाश नारकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश त्यांचे अनेक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन त्यांचा बॉण्ड तितकाच चांगला आहे. मर वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक चढउतारांचा सामना केला आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अविनाश यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाचा प्रसंग सांगितलाय. त्यांना पाहून आईने हंबरडा फोडला तेव्हा ते खचून गेले होते असं ते म्हणालेत.