

avishkar darvhekar
esakal
छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता अविष्कार दारव्हेकर गेले अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीमधून गायब होता. अविष्कार शेवटचा 'बिग बॉस मराठी ३' मध्ये दिसला होता. त्यानंतर तो मालिकांमध्ये दिसेल असं बोललं जात होतं. मात्र तो पुन्हा गायब झाला. आता अविष्कार इतके दिवस का गायब होता याबद्दल त्याने स्वतः खुलासा केला आहे. अभिनेत्याला 'पेम्फिगस व्हल्गॅरिस' हा गंभीर आजार झाला होता. ज्यातून बरं व्हायला त्याला ३ वर्ष जावी लागली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे.