

Prabhas Health Update
sakal
PRABHAS HEALTH CONCERN AFTER DOCTOR POST: बाहुबली, सालर आणि साहो सारख्या एकसे बढकर एक चित्रपटांमुळे आणि आपल्या चार्ममुळे दाक्षिणात्य अभिनेता प्रभास नेहमीच चर्चेत असतो. मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनला आहे. यामागचं कारण म्हणजे हैदराबादमधल्या अपोलो हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के. जे. रेड्डी यांनी सोशल मीडियावर प्रभाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी प्रभासच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचं सांगण्यासोबतच, त्याच्या यशामागे असलेल्या ‘खासगी त्यागा’चाही उल्लेख केला आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्स करत प्रभासच्या तब्येतीबद्दल विचारणा केली असून हे काही गंभीर तर नाही ना असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.