
Entertainment News : संपूर्ण जगभरात ज्याचा डंका आहे तो पुष्पराज आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. 'पुष्पा २' ने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची लाखो तिकिटं विकली गेली आहेत. पुष्पा आणि त्याच्या श्रीवल्लीला पाहायला चाहते उत्सुक आहेत. असं असताना आता 'पुष्पा २'च्या हिंदी व्हर्जनचं डबिंग सुरू झालं आहे. हिंदीमध्ये आता पुष्पाला आवाज कोण देणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. यावेळेसही एक मराठी अभिनेताच अल्लू अर्जुनचा आवाज झालाय.