
Bollywood Entertainment News : दिवंगत दिग्गज अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान सध्या चर्चेत आहे ते त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे. बाबिलने एक व्हिडीओ शेअर केला ज्यात त्याने बॉलिवूड खोटं आहे असं म्हटलं आणि अनेक कलाकार असभ्य असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याने ते व्हिडीओ डिलीट केले आणि नंतर इंस्टाग्राम अकाऊंटही डिलीट केले. त्यानंतर बाबिलच्या टीमने त्याच्या वतीने या व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण जारी केलं आहे.