Bade Miyan Chote Miyan
Bade Miyan Chote Miyan esakal

Bade Miyan Chote Miyan Trailer Out: "दिल से सोल्जर और दिमाग से शैतान हैं हम, बचके रहना हमसे हिंदुस्तान हैं हम"; "बडे मियाँ छोटे मियाँ " चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Bade Miyan Chote Miyan Trailer Out: 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Published on

Bade Miyan Chote Miyan Trailer Out: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि बॉलिवूडचा ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ (Tiger Shroff) स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफचा टायगर इफेक्ट दिसत आहे तर अक्षयचे जबरदस्त अॅक्शन सीन्स दिसत आहेत.

'बडे मियाँ छोटे मियाँ' च्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन स्टंट्स

एक मास सुपरहिरो म्हणून उदयास येत असलेला टायगर हा त्याचा कामाची वेधक झलक 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देत आहे. अक्षय कुमारचाही खिलाडी अंदाज ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलरमध्ये विविध लक्षवेधी डायलॉग्स देखील आहेत. "दिल से सोल्जर और दिमाग से शैतान हैं हम, बचके रहना हमसे हिंदुस्तान हैं हम" या ट्रेलरमधील टायगरच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मनमोहक ॲक्शन स्टंटने भरलेला आहे आणि मोठ्या पडद्यावर हा चित्रपट बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

कधी रिलीज होणार 'बडे मियाँ छोटे मियाँ'?

टायगर श्रॉफचे चाहते आणि फॉलोअर्स 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात मोठ्या पडद्यावर टायगर इफेक्ट पाहण्यासाठी उत्सुक आहेत, तसेच अक्षयचा जबरदस्त अॅक्शन अंदाज देखील ट्रेलरमध्ये दिसत आहे. 10 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर:

Bade Miyan Chote Miyan
Bade Miyan Chote Miyan: 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील 'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज; सोनाक्षी, अक्षय आणि टायगरचा जबरदस्त डान्स

'बडे मियाँ छोटे मियाँ' ची स्टार कास्ट

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' मध्ये मानुषी छिल्लर, अलाया एफ, सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही भूमिका आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या शिवाय टायगर 'रॅम्बो', 'सिंघम अगेन' आणि 'बागी 4'मध्येही दिसणार आहे. टायगरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Bade Miyan Chote Miyan
Bade Miyan Chote Miyan: अक्षय अन् टायगर श्रॉफच्या प्रमोशन सोहळ्यात 'चपलांचा पाऊस'; पाहा व्हिडीओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com