१६ वर्षांपूर्वी हुप्पा हुय्या म्हणत घडवला इतिहास आता 'बजरंगी' येणार भेटीला; पोस्टरमधील अभिनेत्याला ओळखलंत का?

BAJRANGI MOVIE POSTER DO YOU RECOGNISE ACTOR IN POSTER : भव्य हनुमंताच्या विराट रूपाने वाढवली उत्सुकता! ‘बजरंगी’ चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रदर्शित. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का?
bajrangi movie actor

bajrangi movie actor

ESAKAL

Updated on: 

‘बजरंगी’च्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव दिसणार असून त्याची ही भूमिका चित्रपटाच्या कथेत नेमकं काय वळण आणणार याची उत्सुकता आहे. सिद्धार्थ जाधव या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या अंदाजात येणार आहे.आगामी मराठी चित्रपट ‘बजरंगी’चे दमदार पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. भव्य हनुमंताची मूर्ती, तिच्यासमोर उभा असलेला एक तरुण, आजूबाजूला फडकणारे भगवे ध्वज आणि किल्ल्याची पार्श्वभूमी अशी लक्षवेधी दृश्यरचना पोस्टरमध्ये पाहायला मिळते. या भव्य मांडणीतून चित्रपटाच्या कथेला गूढ पार्श्वभूमी असल्याचे संकेत मिळतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com