
Bollywood Entertainment News : शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य ठाकरे हे सध्या बॉलिवूडमध्ये एक नवे आणि उत्सुकता वाढवणारे नाव म्हणून समोर येत आहेत. गाजावाजा न करता, फक्त तळमळीने आणि मेहनतीने त्यांनी आपली वाट बनवायला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या बरोबरचा त्याचा आगामी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आधीच चर्चेचा विषय बनला आहे.