Good News for Balika Vadhu Actress
esakal
Balika Vadhu fame Avika Gor Pregnancy Rumours : हिंदी टेलिव्हिजनमध्ये बालिका वधू ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील अभिनेत्री अविका गौर हिचा अभिनय प्रेक्षकांचा प्रचंड भावला. या मालिकेनं तिला एक वेगळी ओळख करुन दिली. तिने बालिका वधूमध्ये छोट्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती कलर्सवरील 'पती पत्नी और पंगा' या शोमध्ये पहायला मिळाली. दरम्यान याच शोमध्ये ऑन स्क्रीन मिलिंद चांदवानीसोबत लग्न केलं होतं. दरम्यान आता अविका लग्नाला ३ महिने पुर्ण झाले असून तिच्याकडे गुडन्यूज असल्याची माहिती आहे.