Ajay-Atul Bandhu Song : पडद्यावर दोन सख्खे भाऊ, अन् आवाजही सख्ख्या भावांचाच! 'बंधू' चित्रपटात अजय-अतुलच्या सुरेल गीताने जिंकली रसिकांची मने

विजय नारायण गवंडे यांचे संगीत आणि गुरू ठाकूर यांच्या शब्दांत सजलेले 'भाऊ काय बंधू काय' हे ड्युएट गाणे सोशल मीडियावर चर्चेत; २० नोव्हेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित
Real-life brothers Ajay-Atul sang this soulful song together.

Real-life brothers Ajay-Atul sang this soulful song together.

Sakal

Updated on: 

दोन भावांमधील अतूट नाते, प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना जेव्हा मोठ्या पडद्यावर येते, तेव्हा ती थेट काळजाला भिडते. अशीच हृदयस्पर्शी कथा घेऊन येणाऱ्या 'बंधू' या मराठी चित्रपटातील एका गाण्याने सध्या संगीतप्रेमींना अक्षरशः भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील 'भाऊ काय बंधू काय' हे गाणे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लाडके सख्खे भाऊ अजय गोगावले आणि अतुल गोगावले (अजय-अतुल) यांनी एकत्र येऊन गायले आहे.

Loading content, please wait...