

Bapya Movie New Song Out
esakal
Marathi Entertainment News : वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत 'बाप्या' या आगामी चित्रपटातील ‘एकाकी’ हे हळवे आणि भावनिक गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला की, मन किती एकटे पडते, त्या एकाकीपणाची बोचरी जाणीव या गाण्यातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करण्यात आली आहे. हळुवार संगीत, अर्थपूर्ण शब्द आणि भावनिक सादरीकरण यामुळे 'एकाकी' हे गाणे थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करते.