

Bapya Movie Selected In Pune Film Festival
esakal
Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष खरोखरच खास ठरत आहे. आगामी मराठी चित्रपट ‘बाप्या’ याची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ्फ) २०२६ च्या ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’ या विभागात अधिकृत निवड झाली आहे. पिफ्फ २०२६ मधील ही निवड ‘बाप्या’साठी महत्त्वाचा टप्पा असून, आशयघन आणि संवेदनशील विषय हाताळणाऱ्या मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय ओळखीच्या दृष्टीने हे यश महत्त्वाचे मानले जात आहे.