

Bayko Pahije Poster Viral
Marathi Entertainment News : सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. हातात “बायको पाहिजे” असे पोस्टर्स घेऊन उन्हातान्हात फिरणारा हा तरुण सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या तरुणाचं नाव आहे धनराज धोंडीराज दांगट. धनराजवर अशी वेळ का आली? बायको शोधण्यासाठी तो इतका वणवण का भटकतो आहे? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.