

bigg boss marathi 6
esakal
छोट्या पडद्यावर नुकताच ''बिग बॉस मराठी ६' सुरू झालाय. घरात आल्या आल्या स्पर्धकांमध्ये वाद व्हायला सुरुवात झालीये. पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये तुफान राडा झालेला पाहायला मिळाला. तन्वी कोलते आणि रुचिता एकमेकींशी भिडल्या. या भांडणात रुचिता तन्वीला 'तू शेणात तोंड घाल' असं म्हणाली. त्यानंतरच्या तुफानच्या टास्कमध्ये स्पर्धकांनी काहीही न केल्याने 'बिग बॉसच्या घराचे दरवाजे बंद झाले. मात्र शॉर्टकटने आलेल्या स्पर्धकांना जेवण मिळालं. तर आजच्या भागात स्पर्धकांना रेषांसाठी टास्क खेळायचा आहे. या टास्कदरम्यानचा एक व्हिडिओ कलर्स वाहिनीने शेअर केलाय ज्यात तन्वीचं एक वाक्य ऐकून नेटकरी संतापले आहेत.