

bigg boss marathi 6 voting trend
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ''बिग बॉस मराठी ६' मध्ये दररोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. 'बिग बॉस मराठी ६' (BBM6) मध्ये सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दुसऱ्या आठवड्यातील मतदान प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, काही स्पर्धकांवर बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे. गेल्या आठवड्यात जे स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड होते तेच स्पर्धक याही आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या शर्यतीत आहेत. त्यात रुचिता जामदार, अनुश्री माने प्रभू शेळके, राधा पाटील, दीपाली सय्यद, सागर कारंडे, रोशन भजनकर, कारण सोनावणे आणि दिव्या शिंदे यांचा समावेश आहे. त्यात मागच्या आठवड्याच्या मानाने या आठवड्यात वोटिंग ट्रेंडमध्ये खूप बदल झालाय. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरील स्पर्धक थेट शेवटच्या स्थानांवर पोहोचला आहे.