

be dune teen
ESAKAL
लेखक- भूषण सांडे
'बाळ येणार' ही बातमी प्रत्येक जोडप्यासाठी आनंदाची असते, पण जर बाळं एकाऐवजी तीन येणार असतील तर? ZEE5 वरील 'बे दुणे तीन' ही मराठी सिरीज तुम्हाला याच तिळ्यांमुळे नेहा आणि अभयच्या आयुष्यात झालेल्या गोड-हास्यमय गोंधळाची सफर घडवते. नेहा आणि अभय (क्षितिज दाते आणि शिवानी रांगोळे) यांना समजतं की त्यांच्या घरी एकाच वेळी तीन पाहुणे येणार आहेत. सुरुवातीला होणारा अमाप आनंद काही क्षणातच टेन्शन बनतो. कारण तीन बाळं म्हणजे तिप्पट खर्च, तिप्पट जबाबदारी आणि तिप्पट भावनिक आव्हान!