

SHALMALI KHOLGADE
ESAKAL
मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आंतरजातीय विवाह केला आहे. मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे हिने आपल्या गायकीच्या जोरावर लाखो मनांवर राज्य केलं. तिचे लाखो चाहते आहेत. आपल्या हटके गायनाच्या शैलीने तिने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. ती तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. शाल्मली तिची मतं बिनधास्तपाने मांडताना दिसते. तिने 'बलम पिचकारी', 'पिया के बाजार में', 'शायराना' सारख्या गाण्यांना तिचा जादुई आवाज दिला आहे. आता शाल्मलीने सांगितलेला तिच्या आईचा किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.