
Marathi Entertainment News : 'ज्ञानदेवे रचिला पाया। उभारीले देवालया।।' या अभंगाप्रमाणे अखिल वारकरी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी संप्रदायाचा पाया रचला. त्यांच्या भगिनी चित्कला मुक्ताबाई यांनी योगीयांना मार्गदर्शन करणारा 'चांगदेव पासष्टी'सारखा अनमोल ग्रंथ लिहिला. याच मुक्ताबाईंच्या जीवनावर आधारलेला 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा भक्तीरसाने ओतप्रोत भरलेला संगीप्रधान मराठी चित्रपट १८ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित यशस्वीरित्या प्रदर्शित झाला. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून, चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स या नामांकित वितरण संस्थेने केली आहे.