Actress Harassment Case
esakal
अभिनेत्रीवर अत्याचार आणि छळप्रकरणी आरोपी दिग्दर्शक हेमंतकुमार अटकेत
चित्रपटात मुख्य भूमिका देण्याचं आमिष दाखवलं
अभिनेत्रीच्या तक्रारीवरून राजाजीनगर पोलिसांची तातडीची कारवाई
बंगळूर : चित्रपटात नायिकेची भूमिका देण्याचे आमिष दाखवून टेलिव्हिजन अभिनेत्रीवर अत्याचार (Actress Harassment Case) आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी राजाजीनगर पोलिसांनी दिग्दर्शकाला अटक केली आहे. अन्नपूर्णेश्वरीनगर येथील हेमंत कुमार (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे. बिग बॉस ओटीटी स्पर्धक असलेल्या अभिनेत्रीच्या तक्रारीवरून ही कारवाई केली.