SHILPA SHINDE
esakal
SHILPA SHINDE REVEALS CAREER STRUGGLES AFTER SHOW EXIT: हिंदी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे ही तिच्या हटके अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु २०१७ मध्ये शिल्पा शिंदे हिने निर्मात्यावर केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती. 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेचे निर्माते संजय कोहली यांच्यावर तिने लैंगिक छळाचे आरोप केले होते. तसंच मानधन न दिल्याचंही तिनं म्हटलं होतं. त्यानंतर शिल्पाने मालिका सोडली.