Jahnavi Killedar: 'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी; अनेक वस्तू लंपास, धसक्याने आईला अर्धांगवायूचा झटका

Jahnavi Killedar's House Burglary: लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेदार हिच्या घरी चोरी झाली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Jahnavi Killedar
Jahnavi Killedar sakal

अभिनेत्री श्वेता शिंदे हिच्या घरी झालेल्या चोरीची घटना ताजी असताना आता आणखी एका अभिनेत्रीच्या घरी चोरांनी डल्ला मारला आहे. घरातील मौल्यवान वस्तू चोरटयांनी लंपास केल्या आहेत. अभिनेत्रीने या व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. 'भाग्य दिले तू मला' मालिकेतील सानिया म्हणजेच अभिनेत्री जान्हवी किल्लेदार हिच्या घरी चोरी झाली आहे. तिने व्हिडिओ शेअर करत सगळ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. या घटनेचा धसका घेतल्याने अभिनेत्रीच्या आईला अर्धांगवायूचा झटका झाला आहे.

जे शक्य झालं ते सगळं नेलं

जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने म्हटलं, 'नमस्कार. माझं पेणमध्ये एक छोटंसं घर आहे. आम्ही विकेंडला तिकडे जातो. मी माझ्या मम्मी पपांसोबत शनिवार रविवार तिकडे जाते. त्या घरात नुकतीच चोरी झाली आहे. त्या घरातल्या बऱ्याच वस्तू चोरटयांनी नेल्या आहेत. जसं आमच्या घरातले स्पीकर्स, गिटार, महागड्या साड्या, महागड्या घड्याळांचं कलेक्शन अशा बऱ्याच गोष्टी चोरीला गेल्यात. त्यांना जे चोरणं शक्य झालं त्यांनी ते सगळं नेलंय. त्यांनी तर एसी काढण्याचा पण प्रयत्न केलाय पण कदाचित त्यांना ते जमलं नसेल. फ्रिज हलवण्यात आला आहे. पण काही गोष्टी न्यायला शक्य नसल्याने राहू दिल्यात.'

पुढे ती म्हणते, 'व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण हेच आहे की तुमचंही एखादं बंद घर असेल, वीकेंड होम असेल तर काळजी घ्या. चोरांचा अगदी सुळसुळाट झाला आहे. ते नजर ठेवून असतात की या घरात कोण किती वाजता येतं, कधी असतात, मग वेळ साधून ते चोरी करतात. आपण खूप मेहनत करून, आवडीने काही गोष्टी घेतलेल्या असतात त्या गेल्या की वाईट वाटतं. पेण पोलीस याचा तपास करतायत पण चोर हाती लागतील असं वाटत नाही. पण या घटनेमुळे एक वाईट गोष्ट अशी घडली की माझ्या आईने या गोष्टीचा धसका घेतला आणि तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. आताही ती हॉस्पिटलमध्ये आहे. आता तिची तब्येत ठीक आहे.' असं म्हणत तिने आपल्या घराची काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

Jahnavi Killedar
Navra Maza Navsacha 2: अब मजा आयेगा ना भिडू! 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये सिद्धार्थ जाधवची एंट्री; वाचा चित्रपट कधी येणार?
Marathi News Esakal
www.esakal.com