- अश्विनी देशकर
माझे बाबा, त्र्यंबकराव गणेशपुरे... शिक्षण खात्यात मोठे अधिकारी होते. पण स्वभावाने इतके मजेशीर आणि हजरजबाबी होते की घरचं वातावरणच त्यांच्या येण्यानं बदलून जायचं. ते संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर दिवसभर काय झालं, कोणता साहेब काय म्हणाला, कोणत्या शिक्षकानं काय केलं, सगळं त्यांच्या आवाजातच नक्कल करत सांगायचे. इतकं रंगवून सांगायचे की, समोर सीनच उभा व्हायचा. त्यांच्या या शैलीमुळे आम्हाला आम्हाला भारी मजा यायची. खरं तर, माझ्यातला हा विनोदी कलाकार बाबांकडून मिळालेल्या गुणांमधूनच घडला, असं म्हणायला हरकत नाही.