
Marathi Entertainment News: लोकप्रिय मराठी अभिनेते भरत जाधव यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आपल्या विनोदाच्या हटके शैलीच्या जोरावर त्यांनी चित्रपट आणि नाट्यसृष्टी गाजवली. त्यांचं प्रत्येक पात्र अजरामर ठरलं. त्यांचं 'श्रीमंत दामोदरपंत' आणि 'मोरूची मावशी' हे नाटक अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करतंय.हाऊसफुल शो करणाऱ्या भरत यांनी कधीही स्वतःला ग ची बाधा होऊ दिली नाही. ते कायम नम्रपणे वागत आले. मात्र त्यांनी वर्षभरापूर्वी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांनी मुंबई का सोडली.