
Entertainment News: मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचे बादशाह भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान मिळवलं. 'पछाडलेला' ते जत्रा' अशा अनेक चित्रपटांमधून आणि 'मोरूची मावशी' ते 'श्रीमंत दामोदरपंत' अशा नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे भरत मराठी सिनेसृष्टीचं मानाचं पण आहे. अनेक चित्रपट केल्यानंतर ते नाटकांकडे वळले. मात्र करोनामध्ये त्यांनी मुंबईत सोडून कोल्हापूरला बस्तान बसवलं. मात्र वडिलांच्या निधनानंतर भरत यांनी त्यांना पवित्र अग्नी दिला होता. त्यांनी कोल्हापुरातील पवित्र अग्नीची पद्धत एका मुलाखतीत सांगितली आहे.