
शहरातील सर्वात दुर्लक्षित हातांनी आपलं नशीब नव्यानं लिहिण्यासाठी लेखणी उचलली तर काय होईल? या जून महिन्यात ZEE5 या भाषा आणि स्थानिक प्रकारच्या कंटेंटला प्राधान्य देणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं डिजिटल प्रीमियर जाहीर केलं आहे. आता थांबायचं नाय, या सिनेमात मुंबईतल्या स्वच्छता कामगारांना सलाम करण्यात आला असून या हृदयस्पर्शी सिनेमात शहर चालतं ठेवणाऱ्या, परंतु स्वतः पडद्याआड राहाणाऱ्या हिरोंची गोष्ट पाहायला मिळणार आहे. प्रादेशिक कंटेंटप्रती बांधील राहात ZEE5 सादर करत असलेला आता थांबायचं नाय हा एक जबरदस्त सिनेमा असून खऱ्या अर्थाने तुमची भाषा बोलणाऱ्या अॅपवर मराठी भाषा साजरी करणारा आहे.