
अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक मनोजकुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी. त्यांचा जन्म २४ जुलै १९३७ मध्ये वायव्य सरहद्द प्रांतातील अबोटाबाद येथे एका पंजाबी हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला होता. फाळणीनंतर ते वयाच्या दहाव्या वर्षी दिल्लीमध्ये स्थलांतरित झाले. दिल्लीतील हिंदू कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.