BHARTI SINGH
esakal
BHARTI SINGH REVEALS WHY SHE AVOIDS CERTAIN JOKES IN COMEDY: विनोदाचे स्वरूपही काळानुसार बदलत गेले आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विनोदी कलाकार वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करताना दिसतात. काही जण विनोद करताना बिनधास्तपणे कोणत्याही विषयाला हात घालतात, तर काही जण सभ्य आणि कौटुंबिक विनोदाला प्राधान्य देतात. त्यात सोशल मीडियामुळे सतत नवा आणि लक्षवेधी आशय देण्याचा दबावही वाढला आहे. अशा परिस्थितीत विनोदी कलाकार भारती सिंगने मात्र आपल्या विनोदाबाबत ठरावीक मर्यादा ठेवत असल्याचे सांगितले आहे.