
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' ने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. एक झक्कास कथाबाह्य कार्यक्रम म्हणून या त्याची ओळख होती. तब्बल १० वर्ष हा कार्यक्रम झी मराठीवर प्रक्षेपित केला जात होता. यात भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, निलेश साबळे, भारत गणेशपुरे हे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसले. मात्र कालांतराने या कार्यक्रमाची लोकप्रियता कमी झाली. त्याचा परिणाम कार्यक्रमाच्या टीआरपीवर झाला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेते भाऊ कदम यांनी त्यामागचं कारण सांगितलं आहे.