

bhau kadam
esakal
'चला हवा येऊ द्या' मधून प्रेक्षकांच्या मनामनात आणि घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांनी आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. त्यांनी ‘फू बाई फू’ मध्येही दमदार स्कीट सादर केलेली. मात्र चाहत्यांची कलाकारांवर बारीक नजर असते. त्यांनी काहीही चुकीचं केलेलं वाटलं की चाहते त्यांना लगेच टोकतात. इतकंच नाही तर कलाकार समाजात कसा वागतो याकडेही प्रेक्षकांचं लक्ष असतं. असाच एक वाद भाऊ कदम यांनी घरी गणपती बसवल्याने झाला होता. आता अभिनेत्याने पहिल्यांदाच या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे.