
BHAU KADAM
ESAKAL
आपल्या अभिनयाने छोट्या पडद्यासह मोठा पडदाही गाजवणारा अवलिया कलाकार म्हणजे भाऊ कदम. 'चला हवा येऊ द्या' मधून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातून एक वेगळा भाऊ कदम प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यांच्या विनोदाच्या टायमिंगने त्यांनी भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणला. त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं. नुकतेच भाऊ कदम हिंदी चित्रपट 'इन्स्पेक्टर झेंडे'मध्ये झळकलेत. त्यानिमित्ताने त्यांनी दिलेली एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.