'भेटली तू पुन्हा' च्या सिक्वेलची घोषणा! प्रेक्षक खुश, मुख्य भूमिकेत झळकणार 'हे' कलाकार

POOJA SAWANT VAIBHAV TATWAWADI BHETLI TU PUNHA PART 2 : पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी यांच्या 'भेटली तू पुन्हा' च्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आलीये. हे ऐकून चाहत्यांना आनंदाचा धक्का बसलाय.
bhetli tu punha 2

bhetli tu punha 2

esakal

Updated on

तरुणाईच्या पसंतीस उतरलेला "भेटली तू पुन्हा" हा चित्रपट २८ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ९ वर्ष पूर्ण झाली. या चित्रपटात वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत यांची जोडी दिसली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आलीये. "भेटली तू पुन्हा 2" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधीच्या लव स्टोरीच्या पुढची स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com