Pooja Sawant
'भेटशी तू पुन्हा', 'दगडी चाळ', 'जंगली' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत हिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. तिने स्वतःच्या हिमतीवर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. तिच्या सौंदर्याचे आणि डान्सचेदेखील लाखो चाहते आहेत. पूजा मूळची मालवणची आहे.