

Entertainment News : मनोरंजनाचा दर्जा कायम राखत नवनवीन आणि हटके विषय प्रेक्षकांसमोर आणणारे झी स्टुडिओज आणि कायरा कुमार क्रिएशन्स आता प्रेक्षकांसाठी आणखी एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा भन्नाट हॉरर-कॉमेडी चित्रपट येत्या २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.