
Bollywood Entertainment News : गेल्या काही काळापासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरत आहेत. त्यातच ऐश्वर्या आणि बच्चन कुटूंबामध्येही मतभेद असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळेच ऐश्वर्या तिच्या आईकडे राहत असल्याचंही म्हटलं जात होतं. या सगळ्या चर्चा जोर धरत असतानाच लेकीच्या स्नेहसंमेलनाला अभिषेक-ऐश्वर्याने जोडीने हजेरी लावली. तर त्यांच्याबरोबर अमिताभ बच्चनही हजर होते.