

bbm6 VOTING TRENDS
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ६' मध्ये आता खरा राडा सुरू व्हायला सुरुवात झालीये. पहिल्या दिवशीच स्पर्धकांमध्ये बाचाबाची झाली होती. तन्वी कोलते हिने सागर कारंडे याच्याशी बाचाबाची केली. शिवाय त्याला नॉमिनेट केलं. त्याच्या प्रोफेशनबद्दलही वक्तव्य केलं. तर दुसरीकडे तिने दीपाली सय्यद हिच्याशीदेखील वाद घातला. तर राधा पाटील आणि दीपाली सय्यद यांच्यातही वाद झालेला पाहायला मिळाला. राधाच्या डान्सवरून दीपालीने केलेली टीका तिला आवडली नव्हती. या आठवड्यात एकूण ९ जण नॉमिनेट झाले होते. आता त्यातील कुणाला जास्त मतं मिळाली आहेत आणि कुणाला कमी मतं मिळाली आहेत.