

bbm6 sonali raut
esakal
सध्या सगळीकडे 'बिग बॉस मराठी ६' ची हवा आहे. घरात भांड्याला भांडं लागायला सुरुवात झालीये. गेल्या काही दिवसात घरातले सदस्य एकमेकांना टार्गेट करताना दिसतायत. याआधी घरात आलेल्या तन्वी कोलते हिने सागर कारंडे याच्याशी बाचाबाची केली. शिवाय त्याला नॉमिनेट केलं. त्याच्या प्रोफेशनबद्दलही वक्तव्य केलं. तर दुसरीकडे तिने दीपाली सय्यद हिच्याशीदेखील वाद घातला. तर राधा पाटील आणि दीपाली सय्यद यांच्यातही वाद झालेला पाहायला मिळाला. राधाच्या डान्सवरून दीपालीने केलेली टीका तिला आवडली नव्हती. मात्र आता सोनाली राऊत प्रेक्षकांच्या नजरेत आलीये. तिच्या झाडू मारण्याच्या स्टाइलची घरातल्यांनी खिल्ली उडवलीये.