bigg boss marathi 6 exclusive info
esakal
Premier
कशी होते 'बिग बॉस मराठी'च्या स्पर्धकांची निवड? क्रिएटिव्ह डिरेक्टरने सांगितली आतली गोष्ट; म्हणतो- बिग बॉस तुम्हाला शोधतं...
BIGG BOSS MARATHI CONTESTANT SELECTION PROCESS: 'बिग बॉस मराठी ६' चा सीझन नुकताच सुरू झालाय. मात्र या कार्यक्रमातील स्पर्धक कसे निवडले जातात याबद्दल आता क्रिएटिव्ह डिरेक्टरने माहिती दिलीये.
आठवड्याभरापूर्वी 'बिग बॉस मराठी ६' सुरू झालाय. यात अनेक राडे झाले, भांडणं झाली, स्पर्धक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या सीझनमध्ये आलेल्या स्पर्धकांनी त्यांची खरी रूपं दाखवायला सुरुवात केलीये. असं असलं तरी हा सीझनदेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतोय. मात्र 'बिग बॉस मध्ये जाण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, कशी होते 'बिग बॉसच्या स्पर्धकांतजी कास्टिंग, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाच्या क्रिएटिव्ह हेडने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

