
ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो 'बिग बॉस' लवकरच सुरू होणार आहे. यावेळेस हा कार्यक्रमाचा १९ वा सीझन आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय गाजलेल्या आणि वादग्रस्त कार्यक्रमांपैकी एक असलेला हा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली. नेहमीप्रमाणे हा सीझन सलमान खान होस्ट करणार आहे. मात्र यावेळेस बिग बॉसच्या घरात कोणते कलाकार दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता त्यातील एक नाव समोर आलंय.