'बिग बॉस 13' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचं 27 जूनच्या रात्री कार्डियक अरेस्टमुळे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालं. शेफालीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या अचानक जाण्यामुळे फक्त चाहत्यांनाच नाही तर संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसलाय.