
Marathi Entertainment News : बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये परदेशी असूनही अस्सल मराठमोळ्या संस्कारांमुळे अभिनेत्री इरिना रुडोकावाने सगळ्यांचं मन जिंकलं. तिचा घरातील वावर, मराठी पद्धतीचा स्वयंपाक बनवणं अनेकांना आवडलं. बिग बॉसनंतर इरिना आता नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर तिचा नव्या मालिकेतील प्रोमो चर्चेत आहे.