Gautami Patil Bigg Boss Marathi 5: गौतमी पाटील तिच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. महाराष्ट्रात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये गौतमी पाटील वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार अशी चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये सुरु आहे. या चर्चेमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. लोक गौतमीला बिग बॉसमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.