bigg boss marathi 5
bigg boss marathi 5eSakal

Bigg Boss Marathi 3: महेश मांजरेकरांसोबत होणाऱ्या तुलनेवर रितेश देशमुख स्पष्टच म्हणाला- मी काही असं ठरवून...

Riteish Deshmukh On Mahesh Manjrekar: लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख याने त्याच्या आणि महेश मांजरेकर यांच्या तुलनेवर भाष्य केलं आहे.
Published on

'बिग बॉस मराठी ५' पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.हा सीझन २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र जेव्हा जेव्हा बिग बॉस मराठीचा विषय निघतो तेव्हा सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर अभिनेते महेश मांजरेकर यांचा चेहरा येतो. मात्र या सीझनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला तो म्हणजे वाहिनीने कार्यक्रमाचा होस्ट बदलला. या सीझनमध्ये अभिनेता रितेश देशमुख हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसतोय. त्यामुळे एकीकडे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीये तर दुसरीकडे अनेक प्रेक्षक हे महेश मांजरेकरांच्या सूत्रसंचालनासोबत रितेशची तुलना करताना दिसतायत. आता यावर रितेशने उत्तर दिलं आहे.

|

रितेश पहिल्यांदा सूत्रसंचलाकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याला हे जमणार नाही, तो महेश यांच्यासारखा होस्ट नाही बनू शकणार अशा अनेक प्रतिक्रिया तेव्हा देण्यात आल्या. आता यावर रितेशने उत्तर दिलं आहे. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत रितेश म्हणाला, 'काय आहे ना एखाद्या आधीपासून असलेल्या कार्यक्रमासाठी नवीन होस्ट आला तर तुम्ही तुलना करणारच आहात. त्यात काही दुमत नाहीये. मला वाटतं की हिंदीमध्ये सलमान भाऊंचं जे होस्टिंग आहे ती त्यांची वेगळी स्टाइल आहे. महेश मांजरेकरांनी जसं होस्ट केलं ती त्यांची युनिक स्टाइल आहे. ती काय सलमान भाऊंसारखी नव्हती. '

तो पुढे म्हणाला, 'त्यांची एक वेगळी अदा होती, एक वेगळा ऍटीट्युड होता. आणि त्यांना जे नैसर्गिकरित्या सूट करतं त्यांच्या पर्सनॅलिटीला तसं ते होतं. प्रेक्षकांनाही प्रचंड आवडलं. मलाही प्रचंड आवडलं. आता मी होस्ट करतोय तर मी काही असं ठरवून जात नाहीये की मी असं होस्ट करणार आहे हा शो. मला वाटतं तुमच्या व्यक्तिमत्वाला जसं सूट करेल, जे जुळून येईल तसं होस्ट करण्याचा प्रयत्न करेन.' प्रेक्षक 'बिग बॉस मराठी ५' मध्ये रितेशला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकांनी तो चांगला होस्ट बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

bigg boss marathi 5
Bigg Boss Marathi 5 : रांगडा गडी आणि सगळ्यांचा लाडका यार ! घरात प्रवेश करणार 'हे' कलाकार ; पोस्ट झाली व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com