

bbm6 FIRST ELIMINATION
ESAKAL
लोकप्रिय मराठी कार्यक्रम ''बिग बॉस मराठी ६' सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतंय. हा कार्यक्रम सुरू होऊन १ आठवडाही झालेला नाही मात्र घरात राडे नक्कीच सुरू झालेत. त्यात तन्वी कोलते आणि सागर कारंडेचा वाद असेल किंवा तन्वी आणि दीपाली सय्यद यांचा वाद असेल. राधा पाटील आणि दीपाली यांच्यात झालेली बाचाबाची असेल किंवा टास्कदरम्यान विशाल कोटियन आणि ओमकार राऊत यांच्यातील भांडण असेल. प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा होतोच आणि आता सदस्यांच्या आठवड्याभराच्या खेळाचा हिशोब हा भाऊच्या धक्क्यावर होणार आहे. तर कोणता सदस्य घराबाहेर होणार हे देखील आता स्पष्ट झालंय.