

hindavi patil
ESAKAL
सध्या 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या सीझनमध्ये अनेक कलाकार, एक राजकारणी आणि नृत्यांगनादेखील दिसतेय. 'बिग बॉस मराठी'च्या घरात जायचं कसं असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र त्यासाठी 'बिग बॉस'ची टीम सतत काम करत असते. त्यात घरात कोणाला बोलवायचं यासाठी यादी काढली जाते. त्यानंतर अनेकांना संपर्क केला जातो. या सीझनमध्ये लोकप्रिय नृत्यांगना राधा पाटील घरात आली आहे. मात्र तिच्या आधी आणखी एका नृत्यांगनेला 'बिग बॉस मराठी'च्या टीमकडून विचारणा झाली होती. कोण होती ती नृत्यांगना?