

BIGG BOSS MARATHI 6
esakal
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजणारा कार्यक्रम म्हणजे कलर्स मराठीवरील 'बिग बॉस मराठी'. 'बिग बॉस'चे अनेक चाहते आहेत. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं बिग बॉसच्या घरात २४ तास एकत्र राहतात. वेगवेगळे टास्क खेळताना दिसतात. कधी भांडण, कधी प्रेम, कधी माया तर कधी हाणामारी सगळंच बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतं. त्यामुळेच प्रेक्षक बिग बॉस मराठीची आतुरतेने वाट पाहत असतात. गेली वर्षभर प्रेक्षक बिग बॉस मराठीच्या पुढील सीझनची वाट पाहत होते. आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपलीये. कलर्स मराठीने 'बिग बॉस मराठी ६' चा पहिला प्रोमो शेअर केलाय. जो पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.