
सध्याची तरुण पिढी ही लग्नाकडे एका वेगळ्या नजरेने पाहताना दिसते. एकत्र राहिल्यानंतरच खरी माणसं कळतात असं म्हणत आधी लिव्ह इनला महत्व देतात. त्याही पुढे जात आता लग्नच नको असं म्हणण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री लग्न करायला तयार नाहीये. एकतर मी लग्न कारेन किंवा मी आनंदी राहीन असं म्हणत तिने आईसमोर निवड ठेवली होती. ही अभिनेत्री आहे 'बिग बॉस मराठी ३' गाजवणारी स्मिता गोंदकर. तिने 'पप्पी दे पारूला' मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही ती या गाण्यासाठी ओळखली जाते. एका मुलाखतीत स्मिताने आपल्याला लग्नच करायचं नसल्याचं सांगितलंय.