
गेल्या काही वर्षात अनेक मराठी कलाकारांनी स्वतःचं हक्काचं घर घेतलं. काहींनी शहरात नवीन घर खरेदी केलं तर काहींनी आपल्या आवडत्या ठिकाणी टुमदार फार्महाउस बांधलं. त्यात प्राजक्ता माळी, मधुगंधा कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे यांचा समावेश आहे. आता या यादीत आणखी एका अभिनेत्याच्या नावाचा समावेश झाला आहे. 'बिग बॉस मराठी ५' फेम लोकप्रिय अभिनेता त्याचं फार्महाउस बांधतोय. त्याने त्याच्या फार्महाउसचे काही फोटोही शेअर केलेत.